शिंदे समिती बरखास्त करा, अशी मागणी करत छगन भुजबळ यांचा सनसनाटी आरोप काय?

| Updated on: Nov 28, 2023 | 11:59 AM

भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी करून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिलंय. संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधण्यास सांगितलं नव्हतं. आता मराठवाड्यातील हे काम संपलंय. त्यामुळे संदीप शिंदे यांची समिती बरखास्त करा, असा पुन्नरूच्चार भुजबळांनी केलाय

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : कुणबींच्या दाखल्यांवरून छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत. कुणबी नोंदींसाठी स्थापन करण्यात आलेली निवृत्त न्यायमूर्तीची शिंदे समिती बरखास्त करा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. तर पेनानं नोंदी करण्यात येत असल्याचा सनसनाटी आरोपही भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी करून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिलंय. संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधण्यास सांगितलं नव्हतं. आता मराठवाड्यातील हे काम संपलंय. त्यामुळे संदीप शिंदे यांची समिती बरखास्त करा, असा पुन्नरूच्चार भुजबळांनी केलाय. संपूर्ण मंत्रिमंडळात असा विरोध फक्त छगन भुजबळ यांचाच आहे. आता भुजबळांना त्यांच्याच गटातील मंत्री हसन मुश्रीफ यांनीच प्रत्युत्तर दिलंय, शिंदे समितीचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे. त्यामुळे दाखल योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार फक्त समितीलाच असल्याचे त्यांनी म्हटले.

Published on: Nov 28, 2023 11:59 AM
… याला गृहखातंच जबाबदार, हिंमत असेल तर त्या महिला पोलिसांना विचारा, भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आधी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका, आता माघार; मनोज जरांगे पाटलांकडून ‘तो’ शब्द मागे