राज्यात दादा, केंद्रात ताई? शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांनी दिले मोठे संकेत

| Updated on: May 03, 2023 | 12:37 PM

VIDEO | NCP च्या अध्यक्षपदावरून शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू, नाहीच झालं तर..., छगन भुजबळ यांनी कोणते दिले संकेत?

मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल केली. यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांच्या नावावर जोर दिला जात असल्याची चर्चा देखील सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे सर्व जनतेला सुद्धा मोठा धक्का बसला आहे. मात्र शरद पवार यांना आम्ही सगळे जण पुन्हा पुन्हा राजीनाम्या घ्यावा यासाठी समजविण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. शरद पवार अध्यक्ष पदावर असले किंवा नसले तरी ते जे अध्यक्ष देतील त्यानुसार पक्ष चालणार आहे. तसा आदेश दिल्याचे शरद पवार यांनी दिला आहे. तर महाराष्ट्रातील संपूर्ण कारभार अजित पवार बघत आहे आणि केंद्रातील सुप्रिया सुळे देशातील कारभार पाहत आहे. सुप्रिया यांची शैली, त्यांना संसदरत्न दिला आहे. राजकारणाची जाण पाहता योग्य निर्णय होईल असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: May 03, 2023 12:37 PM
राऊतांना कार्ट म्हणत भाजप नेत्याने बेळगावच्या मराठी माणसाला काय केलं आवाहन?
पवारांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचं मोठं पाऊल, तर अनेक पदाधिकाऱ्यांची NCP ला सोडचिठ्ठी