छगन भुजबळ ‘तुतारी’चा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर काय म्हणाले…
छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये फिरतात आणि भंगरे यांच्यासोबत फिरतात, असा आरोपही सुहास कांदे यांनी केला आहे. सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपावर भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळ म्हणाले, सुहास कांदे यांचं अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आमच्या निष्ठेवर कांदे यांनी.....
महायुतीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. सुहास कांदे मेळाव्यात बोलत असताना त्यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. तर छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये फिरतात आणि भंगरे यांच्यासोबत फिरतात, असा आरोपही सुहास कांदे यांनी केला आहे. सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपावर भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळ म्हणाले, सुहास कांदे यांचं अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. मी महायुतीचे काम करत आहे. ही आमदारकीची निवडणूक असल्यासारखं काम करून कमळ निशाणी निवडून आणायच्या सूचना दिल्यात. सुहास कांदे हा आमचा विरोधक आहे हे सर्वांना माहीत आहे. तो नेहमीच आमच्या विषयी खोटं बोलतो. भुजबळांवर टीका केल्याने त्याला मीडियात जास्त प्रसिद्धी मिळते. मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व मदत वैयक्तिकरित्या करत आहे. त्यामुळे आमच्या निष्ठेवर कांदे यांनी सर्टीफिकेट देऊ नये.