100 कोटींच्या मालमत्तेशी माझा काहीही संबंध नाही : छगन भुजबळ
100 कोटींच्या इमारतीवर कारवाई होत आहे, त्यांच्या सोबत माझं नाव जोडलं गेलं आहे.पण त्या इमारतीच्या मालकाने स्पष्टपणे सांगितलं आहे की ही मालमत्ता त्यांच्या कंपणीची आहे. भुजबळ कुटुंबियांचा काही सबंध नाही. आमच्या केसेस 2005 पासून सुरू आहेत , यात नवीन काही नाही. भाजप असे मंत्र्यांवर कारवाईचे दावे का करत कळत नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले.
100 कोटींच्या इमारतीवर कारवाई होत आहे, त्यांच्या सोबत माझं नाव जोडलं गेलं आहे.पण त्या इमारतीच्या मालकाने स्पष्टपणे सांगितलं आहे की ही मालमत्ता त्यांच्या कंपणीची आहे. भुजबळ कुटुंबियांचा काही सबंध नाही. आमच्या केसेस 2005 पासून सुरू आहेत , यात नवीन काही नाही. भाजप असे मंत्र्यांवर कारवाईचे दावे का करत कळत नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले. तुमच्या यंत्रणा स्वतंत्र आहेत. कोर्ट स्वतंत्र आहे तर तुम्ही कस म्हणता हे करू? म्हणजे त्या यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत आहेत का , अस म्हणावं लागेल असं छगन भुजबळ म्हणाले. यंत्रणांना त्यांचं काम करू द्या. नारायण राणे यांच्यावर नाशिक मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला ,याच्याशी माझा काही संबंध नाही ,मी दिल्लीत होतो, असंही ते म्हणाले.