छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ विधानाच्या तीन तासातच ‘वंचित’चं आवाहन काय? भूमिका अन् राजकीय पट बदलतोय?

| Updated on: Feb 12, 2024 | 11:22 AM

सत्तेत मंत्री छगन भुजबळ एकटे पडत असल्याचा आरोप करत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष काढला. मात्र पक्ष स्थापनेनंतर भुजबळ यांना वाटलं तर ते येतील असं शेंडगे यांनी म्हटलंय. आज जेव्हा छगन भुजबळ यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावं, असं वक्तव्य केलं त्यांच्या काही तासातच आंबेडकर यांचं आवाहन काय?

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : जसजशा निवडणुका जवळ येतात तसतशी भूमिका आणि राजकीय पट अजून रंगत चाललाय. सत्तेत मंत्री छगन भुजबळ एकटे पडत असल्याचा आरोप करत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष काढला. मात्र पक्ष स्थापनेनंतर भुजबळ यांना वाटलं तर ते येतील असं शेंडगे यांनी म्हटलंय. आज जेव्हा छगन भुजबळ यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावं, असं वक्तव्य केलं त्यांच्या काही तासातच प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याचं आवाहन केलं. आधी प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यांवं असं मंत्री छगन भुजबळ यांनी आवाहन केलं. त्यावर ओबीसी नेत्यांनी आमच्या नेत्यांनी नादी लागू नये, असं उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. तर प्रकाश शेंडगे यांनी वंचितला पुन्हा मंचावर एकत्रित येण्याचं आव्हान केलंय. त्यावर भुजबळ आणि शेंडगे हे मंडल नाहीतर कमंडलच्या बाजूने होते, असा पलटवार केला. तर अवघ्या १० दिवसात भुजबळांनी ओबीसीचं नेतृत्व करावं, आम्ही सोबत असल्याचं वंचितने म्हटलं.

Published on: Feb 12, 2024 11:21 AM
कोण आहेत संजय राऊत? ते फार मोठे नेते आहेत का? देवेंद्र फडणवीस यांचा खोचक सवाल
जरा कळ सोसा…अजितदादांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले; छगन भुजबळ अन् मुंडेंचा निर्धार काय?