… याला गृहखातंच जबाबदार, हिंमत असेल तर त्या महिला पोलिसांना विचारा, भुजबळ नेमकं काय म्हणाले?
अंतरवाली सराटीतीली लाठीचार्जच्या घटनेवरून एकच बाजू समोर आली याला फक्त गृहखातं जबाबदार असल्याचं सांगत भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. बीड कुणी पेटवलं? असा थेट सवाल करत भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधलाय.
मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : कुणबींच्या नोंदींसंदर्भात शिंदे समितीवरून आव्हान देत असताना छगन भुजबळ यांनी गृहखात्यावरही निशाणा साधला. अंतरवाली सराटीतीली लाठीचार्जच्या घटनेवरून एकच बाजू समोर आली याला फक्त गृहखातं जबाबदार असल्याचं सांगत भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र याची पहिली बाजू समोर आलीच नाही असं म्हणत भूजबळ यांनी फडणवीस यांच्याकडेच बोट दाखवलं. मनोज जरांगे यांनी झालेल्या प्रत्येक सभेतून भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी पलटवार करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. तर यानंतर समाजात तेढ निर्माण होणार नाही, असं कोणतंही भाष्य करू, असे फडणवीस म्हणाले. मात्र बीड कुणी पेटवलं? असा थेट सवाल करत भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधलाय.