छगन भुजबळांनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

| Updated on: Jul 20, 2022 | 3:58 PM

बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत. उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा तसेच 367 ठिकाणी निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

“एक भीती आमच्यात निर्माण झाली होती की आमचं आरक्षणच संपवलं जातंय की काय, ती आता नाहीशी झाली आहे. देवेंद्र फडणवीसांशी माझं पाच-सहा दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं आणि दररोज मी त्यांना मेसेजही करतो. जसं तुषार मेहता हे मध्यप्रदेश सरकारकडून उभे राहिले होते. ॲडव्होकेट मनविंदर सिंगसुद्धा मध्यप्रदेश सरकारकडून उभे राहिले, त्यांनासुद्धा आपल्या या केसमध्ये घ्या. त्यानुसार त्यांनी या केसमध्ये लक्ष दिलं. त्यामुळे फडणवीसांचे आम्ही आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत. उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा तसेच 367 ठिकाणी निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

Banthia Commission report: बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणूक घ्या- सुप्रीम कोर्ट
Bhaskar Jadhav News | विकास कामांनाच शिंदे सरकारची कात्री, शिंदेंच्या खाद्यावरुन भाजप अजेंडा राबवित असल्याचा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा घणाघात