छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?

| Updated on: Dec 23, 2024 | 11:11 PM

मंत्री पद न मिळाल्यामुळे नाराज भुजबळांनी आता थेट मुख्यमंत्री फडणवीसांचीच भेट घेतली आहे आणि आठ ते दहा दिवसांचा फडणवीसांनी वेळ मागितल्याचं सुद्धा यावेळी भुजबळ म्हणालेत.

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले भुजबळ यांनी फडणवीसांशी भेटून आपली नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीसांनी आठ ते दहा दिवसांचा वेळ मागितला असून या कालावधीत त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भुजबळांनी सांगितले. मंत्रिमंडळात अजित पवारांनी स्थान न दिल्याने नाराज असलेले छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीसांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं असून आठ ते दहा दिवसात चांगला मार्ग काढू असं फडणवीसांनी सांगितल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. म्हणजेच आठ ते दहा दिवसात भुजबळांचा निर्णय होईल. मात्र बैठकीतले चर्चेचे अधिक पत्ते काही भुजबळांनी उघडलेच नाहीत. पण या भेटीवरून काही प्रश्न मात्र नक्कीच निर्माण झाले. आठ ते दहा दिवसात मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान दिलं जाईल की नवा मार्ग शोधतील? अजित पवारांना न भेटता फडणवीसांना भेटून भुजबळांना नेमकं काय सांगायचं आहे? फडणवीस मध्यस्थी करत आहेत की भुजबळांना दादांची राष्ट्रवादी सोडायची आहे? ओबीसीचा डीएनए अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये भुजबळ नवीन इनिंग सुरू करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

Published on: Dec 23, 2024 11:11 PM
Ministry Bungalow : महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत? वाल्मिक कराडला बेड्या ठोकणार?