Sambhaji Raje Bhosale : शिवरायांच्या वाघनखांबाबत संभाजी राजे म्हणाले, वाघनखं महाराष्ट्रात आणायचे असतील तर…

| Updated on: Oct 13, 2023 | 3:00 PM

VIDEO | छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखं १६ नोव्हेंबरला महाराष्ट्रात आणण्यात येणार असून ती तीन वर्षांसाठी भारतात असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे म्हणाले, वाघनखं महाराष्ट्रात आणायचे असतील तर ती कायमची आणावीत, वाघ नखे ही महाराजांचीच आहेत का? याबद्दल इतिहासकारांनी शोध घ्यावा.

पुणे, १३ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखं १६ नोव्हेंबरला महाराष्ट्रात आणण्यात येणार असून ती तीन वर्षांसाठी भारतात असणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे यांनी याबाबत भाष्य केले आहे. वाघनखं महाराष्ट्रात आणायचे असतील तर ती कायमची आणावीत, वाघ नखे ही महाराजांचीच आहेत का? याबद्दल इतिहासकारांनी शोध घ्यावा, असेही छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे. तर भाजपा परदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार असल्याचं वारंवार विधान करतायत. परंतु, ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत का? असा सवालही त्यांनी केलाय. तर काही वर्षांपूर्वी त्या म्युझिअममध्ये जाऊन ती वाघ नखे बघितली होती. त्या ठिकाणी ती वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराज यांची असण्याची शक्यता आहे असं लिहिल्याचं संभाजी राजे यांनी म्हटले आहे. तर साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँडफ्ला ही वाघनखं सुपूर्द केली होती, असा इतिहास असल्यासचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 13, 2023 03:00 PM
आपल्याला बारामती जिंकायची आहे, कामाला लागा; कुणी दिल्या कार्यकर्त्यांना सूचना?
Sanjay Raut : संजय राऊत यांची पुन्हा भविष्यवाणी? म्हणाले, राज्यातील सरकार जाण्याची वेळ आली