मराठा आरक्षणाबद्दल संभाजीराजे यांची भूमिका स्पष्ट, म्हणाले, ‘समाजाची जी भूमिका असेल…’
VIDEO | मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळू शकेल आणि त्यासाठी काय करायला लागेल? छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली स्पष्टपणे भूमिका, 'मागण्यासंदर्भात मराठा समाजाची जी भूमिका असेल ती माझी असणार'
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर २०२३ | जालन्यात उपोषण करत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी अनेकदा भेट दिली आहे. त्यांच्या मागण्यासंदर्भात मराठा समाजाची जी भूमिका असणार तीच माझी असणार, सरकारच्या समितीला मी काही मुद्दे सुचवले असल्याचे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. या अगोदर मराठा समाजातील 40 पेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. हा विषय वाढू नये यातून काहीतरी मार्ग निघावा आणि सरकारने यातून लवकरात लवकर मार्ग काढावा, असे संभाजी राजे म्हणाले. मराठा आंदोलनात सुरुवातीपासून सक्रीय असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षणावर बोलताना असेही म्हटले की, तुम्हाला आरक्षण मिळावायचे असेल, तर काही पॅरामीटर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मागास म्हटलेलं नाही. पहिल्यांदा मराठा समाजाला आयोगाने मागास ठरवायला हवं, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.