रायगडावरील ‘वाघ्या’ची चर्चा असताना छत्रपती शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
छत्रपती शाहू महाराजांचा अत्यंत प्रिय असलेल्या खंड्या असं नाव असणाऱ्या श्वानाची समाधी साताऱ्यातल्या संगम माहुली परिसरात आज देखील पाहायला मिळत आहे.
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची चर्चा होत असताना साताऱ्यातील संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रिय खंड्या श्वानाचीही चर्चा होतेय. छत्रपती शाहू महाराज यांचा लाडका असणाऱ्या खंड्या श्वानाने शिकारीदरम्यान, शाहू महाराजांचे प्राण वाचवले होते. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी साताऱ्यातील संगम माहुली येथे या खंड्याची समाधी बांधली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे प्राणी प्रेम आपल्याला इतिहासात नमूद असल्याचा पाहायला मिळतं. या खंड्या नावाच्या श्वानाची समाधी लाल दगडामध्ये बांधलेली आहे. सुमारे 250 वर्ष पूर्वीपासूनची ही समाधी असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. या खंड्या श्वानाचे वैशिष्ट्य म्हणजे तो छत्रपती शाहू महाराजांचा अत्यंत प्रिय आणि इनामदार कुत्रा होता. खंड्या कुत्र्याने शिकारीदरम्यान छत्रपती शाहू महाराजांचे प्राण वाचवताना स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शाहू महाराजांनी या खंडाची समाधी संगम माहुलीमध्ये बांधली होती. बघा व्हिडीओ