शिवराज्याभिषेक सोहळा सोडून सुनिल तटकरे तडकाफडकी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी, काय कारण?

| Updated on: Jun 02, 2023 | 12:41 PM

VIDEO | किल्ले रायगडावरील ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्यावर खासदार सुनिल तटकरे नाराज, म्हणाले...

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक बडे राजकीय नेते मंडळीदेखील उपस्थित आहे. रायगडावर मोठ्या उत्साहात महाराजांचा शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. रायगडावर मोठ्या दिमाखात महाराजांचा हा सोहळा पार पडला होता. त्या अविस्मरणीय क्षणाला आज तिथीनुसार, ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत. एकीकडे हा सोहळा जंगी स्वरूपात होताना दिसतोय तर दुसरीकडे या कार्यक्रमाच्या वेळी मात्र नाराजी नाट्य पाहायला मिळालं. खासदार सुनील तटकरे या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सुरू असताना ते तडकाफडकी गडाच्याखाली आल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. तसेच महापूजेचा सन्मान वारकऱ्यांना दिला नाही. तर कार्यक्रमातील अनेक त्रुटींमुळे तटकरे नाराज होऊन निघून गेले यावेळी त्यांच्यासोबत आमदार अनिकेत तटकरे असल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Jun 02, 2023 12:20 PM
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंहासन लवकरच हलणार”, संजय राऊत यांचा दावा
कोस्टल रोड ते शिवसृष्टी, रायगडावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या 3 घोषणा