Beed | शिवजयंतीनिमित्त बीडमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्याच निमित्त बीडमध्ये डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. बीडच्या शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याभवती ही नयन रम्य रोषणाई करण्यात आलीय.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता महापूजा करण्यात आली. दरम्यान मागील दोन वर्षांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव असल्याने शिवजयंतीवर निर्बंध होते. माञ यंदा निर्बंध काही अंशी शिथिल झाल्याने शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण शहर हे भगवेमय झाले आहे. आज बीडकरांसाठी अनोखी पर्वणी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्याच निमित्त बीडमध्ये डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. बीडच्या शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याभवती ही नयन रम्य रोषणाई करण्यात आलीय. कोरोना महामारीत गेली दोन वर्षे जयंती महोत्सव साजरा करता आला नाही मात्र सध्या कोरोनाची तीव्रता सौम्य असल्याने यंदा जयंती महोत्सव जय्यत करण्यात येतोय.