फरार आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर बेड्या, तोंडाला काळा रूमाल बांधून आला अन्…

| Updated on: Sep 05, 2024 | 12:16 PM

शिल्पकार जयदीप आपटे हा पुतळा कोसळल्यापासून 11 दिवस फरार होता. यामुळे पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. पोलिसांच्या ७ पथकांकडून आरोपी जयदीप आपटेचा शोध घेतला जात होता. त्यानंतर काल रात्री उशिरा कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जयदीप आपटेला बेड्या ठोकल्या आहेत.

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात एकच संतापाची लाट उसळली होती. या दुर्घटनेनंतर फरार असलेला आरोपी शिल्पकार जयदीप आपटे अखेर हाती लागला आहे. शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांची नजर चुकवत जयदीप आपटे हा आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जयदीप आपटे हा सापडला असला तरी आता त्याचे कुटुंब गायब झाल्याची माहिती आहे. काल रात्री कल्याण येथे कुटुंबीयंना भेटण्यासाठी आलेल्या आपटेच्या तोंडाला काळा रूमाल होता. यावेळी घराबाहेर असलेल्या पोलिसांनी रात्री साडे ९ ते दहा वाजेदरम्यान आरोपीला अटक केली. कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना दिला असून पोलीस आज आपटेला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या ७ पथकांकडून आरोपी जयदीप आपटेचा शोध घेतला जात होता अखेर त्यांचा अटक करण्यात आली आहे.

Published on: Sep 05, 2024 12:16 PM
MSRTC Employees Strike : ‘लालपरी’चा संप मागे, ST कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या घोषणेनंतर सदावर्ते दाम्पत्याचा राडा
MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा अन् मुख्यमंत्री म्हणाले, आता ‘लालपरी’तून बाप्पा घरात…