शिवप्रेमींसाठी मोठी बातमी, शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?

| Updated on: Jul 17, 2024 | 6:07 PM

शिवप्रेमींसाठी मोठी बातमी आहे. शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे दाखल झाली आहेत. 19 जुलै रोजी याचं दिमाखात मोठं स्वागत केलं जाणार आहे. बघा कधी-कुठे पाहता येणार?

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे दाखल झाली आहेत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून कोणालाही प्रवेश दिला जात नाही. 19 जुलै रोजी याचं दिमाखात मोठं स्वागत केलं जाणार आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनख्यांसाठी विशेष अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. वाघनख्यांचे जंगी स्वागत जिल्हा प्रशासनासह साताऱ्यातील शिवभक्त करणार आहेत. या स्वागतासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखं सातारा जिल्हा हद्दीत दाखल झाल्यानंतर येत्या19 जुलै रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं शिवभक्तांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे.

Published on: Jul 17, 2024 06:07 PM
लाडक्या बहिणींनंतर आता तरूणांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
लाडक्या बहिणीनंतर आता मुख्यमंत्र्यांचे भाऊही लाडके…शिंदेंकडून नव्या योजनेची घोषणा, कोण पात्र अन् अटी काय?