शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली-वहिली झलक

| Updated on: Jul 19, 2024 | 3:33 PM

वाघनखं आज साताऱ्यात आणल्यानंतर वस्तू संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. ही शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फक्त वाघनखंच नाहीत तर इतर शस्त्रदेखील शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव देण्यास आलं आहे.

शिवरायांनी ज्या वाघनखांचा वापर करून अफजल खानाचा कोथळा काढला होता. ही ऐतिहासिक वाघनखं आता लंडनहून महाराष्ट्रात आणण्यात आली आहे. ही वाघनखं आज साताऱ्यात आणल्यानंतर वस्तू संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. ही शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फक्त वाघनखंच नाहीत तर इतर शस्त्रदेखील शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव देण्यास आलं असून या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यानंतर पहिल्यांदाच शिवकालीन वाघनखांची पहिली झलक महाराष्ट्राला बघायला मिळाली. साताऱ्यात वाघनखनांचं प्रदर्शन आहे. त्यामुळे सातरकरांना सुद्धा उत्सुकता आहे. या वाघनखांची लांबी 8.6 सेमी इतकी आहे. या वाघनखांचं वजन हे केवळ 49 ग्रॅम इतकं आहे.

Published on: Jul 19, 2024 03:33 PM
Microsoft Global Outage : जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, ‘या’ क्षेत्राला बसला मोठा फटका
कोकणातील ‘या’ दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?