एकदम जवळून बघा वाघनखं…’ tv9 मराठी’ वर पहिली झलक अन् जाणून घ्या वैशिष्ट्ये
साताऱ्यात वस्तू संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त वाघनखंच नाही तर इतर शस्त्रास्त्रांचंदेखील प्रदर्शन शिवप्रेमींना यावेळी पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव देण्यात आलं आहे. जाणून घ्या वाघनखांची वैशिष्ट्ये..
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. तीच वाघनखं आता महाराष्ट्रात दाखल झाली असून शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींना याची देही याची डोळा पाहता येणार आहे. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त वाघनखंच नाही तर इतर शस्त्रास्त्रांचंदेखील प्रदर्शन शिवप्रेमींना यावेळी पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव देण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांच्या प्रदर्शानाच्या कार्यक्रमांचं उद्घाटन पार पडलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर आता सर्वसामान्यांनाही या वाघनखांचं दर्शन घेता येणार असून ही वाघनखं जवळून समक्ष पाहता येणार आहे. या वाघनखांची लांबी 8.6 सेमी इतकी आहे. या वाघनखांचं वजन हे केवळ 49 ग्रॅम इतकं आहे. तर पट्टीची लांबी 7.5 सेंटीमीटर इतकी आहे. पोलाद, चामडे आणि रेशीमने बनलेली ही वाघनखं आहेत. जाणून घ्या वाघनखांची आणखी वैशिष्ट्ये..