नेमकं कोणाचं सरकार? 4 जूनला फैसला, महाराष्ट्रात 48 जागांवर कुठं, कधी मतदान?
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. एकूण ७ टप्प्यात देशभरात निवडणुका पार पडणार आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे.
मुंबई, १७ मार्च २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. एकूण ७ टप्प्यात देशभरात निवडणुका पार पडणार आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील ४८ मतदारसंघात कधी कुठे मतदान होणार? बघा स्पेशल रिपोर्ट… लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान हे १९ एप्रिलला होणार आहे. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून ला सातवा टप्प्यातील मतदान होणार आहे. तर या सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ४ जूनला निकाल लागणार आहे. तर महाराष्ट्रात ४८ जागांवर १ ला टप्पा १९ एप्रिल, २ टप्पा २६ एप्रिल, ३ रा टप्पा ७ मे, ४ था टप्पा १३ मे आणि पाचवा टप्पा २० मे रोजी होणार आहे.