Special Report | मुख्यमंत्री आदित्य ठाकरे…अजितदादांचं स्लिप ऑफ टंग
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. असं काहीही नाही. आमचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंच आहेत, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी मीडियाशी संवाद साधताना अनावधानाने आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब असा केला. अजित दादांच्या या स्लीप ऑफ द टंगची दिवसभर बातमी चालल्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांनी त्यावर खुलासा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. असं काहीही नाही. आमचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंच आहेत, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.