मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल! मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणार चर्चा
त्यामुळे मंत्रालयात सचिवांनाच हे अधिकार देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून नागरिकांची कामं खोळंबू नये, यासाठी मंत्र्यांचे अधिकार सचिवांना बहाल करण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
मुंबईः राज्यातल्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व विभाग किंवा खात्याच्या सचिवांना सदर खात्यातील प्रकरणांतील निर्णय घेण्याचे आधिकार देण्यात आले आहेत. महिनाभरापासून राज्यातील विविध खात्यांना मंत्री मिळालेले नाहीत. कोर्टातील (Supreme court) आमदारांची अपात्रतेची केस किंवा शिंदे-भाजपमधील (Shinde-BJP) वाटाघाटी, अशा महत्त्वपूर्ण कारणांमुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रालयात सचिवांनाच हे अधिकार देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून नागरिकांची कामं खोळंबू नये, यासाठी मंत्र्यांचे अधिकार सचिवांना बहाल करण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.