मुख्यमंत्री एकनात शिंदे कोल्हापुरात दाखल; पूरस्थितीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आज सांगली आणि कोल्हापूरचा दौरा आहे. सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आज सांगली आणि कोल्हापूरचा दौरा आहे. सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसुद्धा घेणार आहेत. कोल्हापुरात मागील चार दिवसांपासून पूर परिस्थिती आहे. जिल्ह्यातील पूरबाधितांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पाण्याखाली गेलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Published on: Aug 13, 2022 12:23 PM