पुण्यातील सोहळ्यात शिंदे यांच्या नावाची खुर्ची, पण शिंदे यांची गैरहजेरी; काय कारण? बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Aug 12, 2023 | 11:05 PM

VIDEO | पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्याला एकनाथ शिंदे गैरहजर, सोहळ्यात शिंदे यांच्या नावाची खुर्ची, पण शिंदे यांची गैरहजेरी... मुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित अन् चर्चांना उधाण...बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. यावेळी मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू होती. मात्र याबाबत अजित पवार यांनी स्वतः माहिती देत सुरू असलेल्या चर्चांना खोटं ठरवलं. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री पुण्यातील कार्यक्रमात गैरहजर असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मात्र या सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची खुर्ची असल्याने चर्चा रंगल्यात. मात्र या सुरू असलेल्या चर्चांना अजितदादांनी तथ्यहिन म्हटलंय. पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री येणार नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री हजर राहणार असं सांगण्यात आलं मात्र ते सुद्धा नंतर झालं नाही. यादरम्यान, १५ ऑगस्टनंतर आम्ही बळजबरीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत, असे संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

Published on: Aug 12, 2023 11:02 PM
मुंबईतील ‘मंगळागौर’ कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांची हजेरी, बघा कोणतं गायलं सुरेल गाणं?
मुलाकात हुई, क्या बात हुई? बंडानंतर अजित पवार यांची पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत गुप्त बैठक