डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलंय, शिंदेंचा कुणाला खोचक टोला?

| Updated on: Apr 07, 2024 | 7:19 PM

डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर काही लोकांचे गळ्याचे पट्टे काढले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी तुमाने यांच्यावरही भाष्य केले आहे.

डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर काही लोकांचे गळ्याचे पट्टे काढले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी तुमाने यांच्यावरही भाष्य केले आहे. तुमाने यांना मी सांगितलं निवडणूक लढवायची नाही, त्यांनी ऐकलं. आता त्यांना खासदारापेक्षा मोठा मान तुमाने यांना देणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. ‘दिल्लीत जाऊन दोनदा खासदार झालेला नेता आपल्या पक्षाच्या नेत्यानं सांगितलं यावेळी उमेदवारी लढवायची नाही. नगससेवक आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी किती चुरस असते आता तर लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे आता खासदारापेक्षा तुमाने यांना मोठा मान दिल्याशिवाय मी राहणार नाही’, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय.

Published on: Apr 07, 2024 07:19 PM
मनसे महायुतीच्या सहभागावर दरेकर म्हणाले, त्या सगळ्यांना सोबत नेण्याची आमची तयारी
छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास…., मनोज जरांगे पाटलांचा इशारा काय?