फडणवीसच नाही तर महाजन, शेलारांसह दरेकरांच्या अटकेचा डाव, मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Apr 22, 2024 | 1:30 PM

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे गौप्यस्फोट केल्याचे पाहायला मिळाले आहे. बघा काय म्हणाले एकनाथ शिंदे?

महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार मुंबईमध्ये तीन जागा लढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे गौप्यस्फोट केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून ठाकरेंचे शिलेदार आणि विश्वासू मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसताय. इतकंच नाहीतर त्यांना महायुतीकडून दक्षिण मुंबईच्या जागेवर लोकसभा लढण्याची ऑफर दिल्याचीही चर्चा होती. या चर्चावर मुख्यमंत्री यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्प्ष्ट म्हणाले, मिलिंद नार्वेकर यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही. तर महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलारांना अटक करण्याचा डाव होता, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदेंनी केलाय.

Published on: Apr 22, 2024 01:30 PM
मंत्री उदय सामंतांच्या ताफ्यावर दगडफेक, यवतमाळच्या प्रचारसभेला जाताना काय घडलं?
प्रचारसभा आटोपून परतत असताना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात