हेच जागा वाटपाचं सूत्र, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 16, 2024 | 11:59 AM

आगामी विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून २ टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचे मोठे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. वर्षा निवासस्थानी पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदेंनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले.

Follow us on

स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वर्षा या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागावाटपावर भाष्य केले. तर येत्या ८ ते १० दिवसांत जागावाटप पूर्ण कऱणार असल्याचेही माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर ही निवडणूक दोन टप्प्यात होणार असल्याचा अंदाजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्तविला आहे. यावेळी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेही म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला उमेदवार निवडताना सर्वेक्षणाचा आधार घेण्यात येणार तर विधानसभेला तिनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान, लोकसभेला भाजपच्या सर्व्हेचा जागावाटप आणि उमेदवार ठरवताना फटका बसला असल्याचे पाहायला मिळाले होते.