‘तुम्ही केव्हापासून निष्ठावंत, कडवट शिवसैनिक झालात?’, मुख्यमंत्र्यानी कुणाला विचारला खोचक सवाल, बघा…

| Updated on: Feb 26, 2023 | 8:07 PM

VIDEO | हिवाळी अधिवेशनातील चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर, शिंदे-फडणवीस सरकारने आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अधिवेशाबाबत माहिती देताना सकाळी अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना देखील प्रत्युत्तर दिले. आरोप करताना मोठ्या पदावर तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणूनही राहिले आहात कोणतेही आरोप करताना पुरावे असावेत. आरोप कुणीही करतं त्याला अक्कल लागत नाही, असे म्हणत खोचक टीकाही केली. पुढे ते असेही म्हणाले, अजित पवार म्हणताय हे घटनाबाह्य सरकार आहे. शिवसेना सोडल्यानंतर काय होतं बघा, यावर एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनाच आहे आम्ही. पण अजित पवार तुम्ही केव्हापासून निष्ठावतं कडवट शिवसैनिक झालात, याचा थोडा शोध लावा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे खिल्ली उडवली.

Published on: Feb 26, 2023 08:06 PM
निवडणूक आयोग दळभद्री, ठाकरे गटाच्या नेत्यानं इलेक्शन कमिशनवर केली सडकून टीका; बघा व्हिडीओ
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक, काय आहे कारण?