अन् एकनाथ शिंदे भावूक झालेत, श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं भावनिक ट्वीट
'श्रीकांतच्या भाषणामुळे संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरुन गेला...', श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं भावनिक ट्वीट केले आहे. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘श्रीकांतच्या भाषणामुळे संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरुन गेला…’, श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं भावनिक ट्वीट केले आहे. ‘माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला. सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.’ असे ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले तर शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती…असेही शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटलं.