शरयू नदीच्या किनाऱ्यावर शिंदेमय वातावरण, अयोध्या दौऱ्याबाबत नरेश म्हस्के म्हणताय…

| Updated on: Apr 08, 2023 | 3:48 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार, खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार शरयू नदीची महाआरती

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर असून शरयू नदीची संध्याकाळी महाआरती होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी हजर राहणार आहेत. या ठिकाणची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के दाखल झाले असून त्यांनी या ठिकाणची पाहणी केली आहे. यावेळी ते म्हणाले, शरयू नदीच्या किनाऱ्यावर भगवेमय, शिंदेमय आणि शिवसेनामय वातावर तयार झालं आहे. आमचा पक्ष हिंदूत्व सोडून दूसरीकडे वळला त्याला पुन्हा मूळ पदावर आम्ही आणतोय. राम हे सत्य वचनी होते. ते सत्याचा पुरस्कार करायचे, अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेनेवर केली. याला प्रत्युत्तर देत नरेश म्हस्के म्हणाले, शिवसेना प्रमुख यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती धरला होता मात्र शरद पवार यांच्या स्क्रिप नुसार संजय राऊत यांनी हिंदुत्वाचा झेंडा तिथे वळवला. तर नाचता येईना आणि अंगण वाकड अशी अवस्था आदित्य ठाकरे यांची झालेली आहे त्यांच्याकडे आता बोलण्यासाठी फार काही राहिला नाही, अशी टीकाही त्यांच्याकडे केली आहे.

Published on: Apr 08, 2023 03:48 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, पण…; उदय सामंत यांची प्रतिक्रिया
अयोध्येतील राम मंदिराचं काम वेगाने सुरु, बघा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ; कधी होणार दर्शनासाठी खुलं