जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या हातांनी शेती करतात… फिरवलं रोटर अन्…

| Updated on: Jan 24, 2024 | 6:23 PM

महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब उचाट आदी पंधरा गावांची मिळून उत्तरेश्वर यात्रा भरते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या गावी दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात स्वतःच्या हातांनी शेतात रोटर फिरवला. इतकंच नाहीतर हळदीच्या शेतात त्यांनी हळद काढण्याचं कामही केलं.

सातारा, २४ जानेवारी २०२४ : महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब उचाट आदी पंधरा गावांची मिळून उत्तरेश्वर यात्रा भरते. या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या गावी दौऱ्यावर गेले आहे. मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या गावी आगमन झाले. तर या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे जिल्ह्यातील विकास कामांची माहिती घेणार आहेत. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात स्वतःच्या हातांनी शेतात रोटर फिरवला. इतकंच नाहीतर हळदीच्या शेतात त्यांनी हळद काढण्याचं कामही केलं. यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना राज्य सरकारला टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन टाळलं पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Published on: Jan 24, 2024 06:23 PM
ताटाखालचं मांजर कोण? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सत्तेवरून जुपंली
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार की नाही? जरांगेंच्या मुंबईच्या पायी मोर्च्याबद्दल काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?