‘… वेळ येऊ देऊ नका’, उद्धव ठाकरे यांनी उडवलेल्या खिल्लीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऋषी सुनक यांच्या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी उडवलेल्या खिल्लीवरून एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'लंडनमधलं सगळं माहिती आहे, बाहेर काढायची वेळ येऊ देऊ नका'
मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऋषी सुनक यांच्या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे. लंडनमधलं सगळं माहिती आहे, बाहेर काढायची वेळ येऊ देऊ नका, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. तर उगाचच पाटणकर काढा घेण्याची वेळ आणू नका, असा खोचक टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. जळगाव येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली होती. ‘ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढलाय पण त्यांना काय बोलले हे तर सांगा. त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोलले’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं होतं.