‘म्हणून मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो’, उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेवर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कर्नाटकातील प्रचारात उत्तर, म्हणाले...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे हे कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोम्मईंची भांडी घासायला कर्नाटकमध्ये गेले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, शिवसेना -भाजप युतीचा मुख्यमंत्री म्हणून मी युतीचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकात आलो आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सम विचारी सरकार आहे आणि कर्नाटकातही समविचारी सरकार आहे. त्यामुळे डबल इंजिन सरकार यावं यासाठी मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कर्नाटक राज्यात येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून काँग्रेस आणि भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकात ठाण मांडून आहेत. तसेच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा करत शिंदेंना कर्नाटकी पद्धतीची पगडी घालून जंगी स्वागत करण्यात आल्याचेही पाहायला मिळाले.