भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबाजीवरून अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला खोचक टोला, बघा काय म्हणाले
VIDEO | विधानसभेत तूफान फटकेबाजी करत अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी काढले चिमटे, भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबाजीवरून काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुंबई : भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरवरुन राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगतेय आणि याचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पाहायला मिळाले. विधानसभेत बोलत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला लगावला आहे. दरम्यान, सभागृहात मुख्यमंत्री बोलत असताना भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आल्याचाही विषय निघाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तूफान फटकेबाजी केली अणि सभागृहात एकच हस्यकल्लोळ पाहायला मिळाला. जयंत पाटील, अजित पवार तुम्ही आणि इतर लोकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. अजित दादा तुम्हीच सांगितले आहे की साईज सुद्धा एकच आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ठरवून घ्या कुणाचं तरी नाव आणि नंतर फिक्स करून घ्या आपण नंतर बघू त्याचे काय करायचे ते असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षालाच टोला लगावला आहे.