Special Report | नीती आयोगाच्या बैठकीला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिसऱ्या रांगेत
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!
मुंबई : तृणमूलच्या नेत्या आणि भाजपच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी पहिल्या रांगेत. काँग्रेसचे नेते आणि भाजपचे विरोधक अशोक गहलोत पहिल्या रांगेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दुसऱ्या रांगेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी दुसऱ्या रांगेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) मात्र तिसऱ्या रांगेत. दिल्लीत झालेल्या निती आयोगाच्या(Niti Aayog ) बैठकीनंतर हा फोटो समोर आलाय. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर टीका केली. पहिलं ट्विट केलं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!
रोहित पवारांनी असं ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही प्रतिक्रिया दिली. तिसऱ्या रांगेत उभ्या असलेल्या शिंदेंच्या फोटोवर विरोधकांनी टीका केल्यानंतर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. दिल्लीत महाराष्ट्राला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळते असं बोललं जातं. एकनाथ शिंदेंच्या तिसऱ्या रांगेतल्या फोटोवरुन पुन्हा राजकारण सुरु झालंय.