कसब्यात भाजपसाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात, यासह जाणून घ्या अपडेट

| Updated on: Feb 17, 2023 | 8:04 AM

पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकरता भाजपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरले असून २० फेब्रुवारी रोजी मेळावा घेणार

मुंबई : मुंबई : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकरता भाजपसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरले असून २० फेब्रुवारी रोजी मेळावा घेणार असून भेटी-गाठीतून प्रश्नही समजून घेणार आहे. चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाने जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेला हजेरी लावणार आहे. मुख्यमंत्र्यांसह संजय राऊत आणि आंबादास दानवेही आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तर येत्या ५ मार्चला उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी दौऱ्यावर असून खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी कोकणातील ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी भाजपची फिल्डिंग सुरू असून दोन्ही जागा भाजपकडे असाव्यात अशी अमित शाह यांची इच्छा आहे तर खासदार धनजंय महाडिक यांनी हे वक्तव्य केले आहे.


Published on: Feb 17, 2023 07:56 AM
देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावरून राष्ट्रवादीत खळबळ; लवकरच मोठा धमाका करणार, पुन्हा दिला इशारा
भाजप नेत्याचा आदेश, म्हणाला अजित पवार यांना द्या ४४० चा करंट, पुन्हा नाव…