‘गृहमंत्र्यांच्या कामकाजावर मुख्यमंत्री नाराज नाहीत’, मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा
गृहमंत्र्यांच्या कामकाजावर मुख्यमंत्री नाराज नाहीत, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचं उद्धव ठाकरेंनी खंडन केलं आहे.
गृहमंत्र्यांच्या कामकाजावर मुख्यमंत्री नाराज नाहीत, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचं उद्धव ठाकरेंनी खंडन केलं आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.