Navneet Rana | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब सरकारमध्ये फेल : नवनीत राणा

| Updated on: Nov 22, 2021 | 5:33 PM

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची गुप्त बैठक झाली. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची गुप्त बैठक झाली. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली, तर या भेटीवरून त्यांनी तीन पक्षाचे सरकार कोण चालवले हे स्पष्ट झाले असल्याचेही राणा म्हणाल्या. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले त्यामुळे आता आशेची किरण निर्माण झाले आहेत, एक चांगला संदेश मिळेल व एसटी कर्मचारी आंदोलनावर तोडगा निघेल अस त्या म्हणाल्या. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री अनिल परब हे सरकारमध्ये फेल असल्याची टीका नवनीत राणा यांनी केली.
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 22 November 2021
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 22 November 2021