Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काय भावना मांडल्या ?

| Updated on: Nov 25, 2021 | 6:50 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर मान आणि मणक्याच्या दुखण्यासंदर्भात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांच्यावर फिजीओथेरेपी सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. या पार्श्वभूमीवर आजारपणातदेखील ठाकरे अॅक्श्न मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. ते आज (25 नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर मान आणि मणक्याच्या दुखण्यासंदर्भात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांच्यावर फिजीओथेरेपी सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. या पार्श्वभूमीवर आजारपणातदेखील ठाकरे अॅक्श्न मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. ते आज (25 नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बैठकीदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. “या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे;” असे ते म्हणाले. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक-पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रिमंडळास दिली.