मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला – छत्रपती संभाजीराजे

| Updated on: May 27, 2022 | 11:43 AM

राज्यसभेसाठी माझ्या उमेदवारीला पाठिंबा नाकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.

मुंबईः कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीत उभे राहणार नसल्याची घोषणा केली आहे. राज्यसभेसाठी माझ्या उमेदवारीला पाठिंबा नाकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.  “गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री, शिवसेनेचे मंत्री आणि एक खासदार यांच्याशी माझी चर्चा सुरु होती. त्यांच्या सूचना, माझ्या सूचनांचा एक सविस्तर ड्राफ्टही तयार झाला होता. तो ड्राफ्ट पाहून मी कोल्हापुरलाही निघालो होतो” असं संभाजी राजे म्हणाले.

Published on: May 27, 2022 11:42 AM
Kirit Somaiya : अनिल परब यांना जेलमध्ये जावं लागणार, किरीट सोमय्यांचा इशारा
Pravin Darekar On MVA Sarkar | अपक्ष आमदारांवर मुख्यमंत्र्यांचा दबाव असणार – Pravin Darekar