CM Sangli Visit PC | निसर्गापुढे आपण हतबल, कठोर निर्णय घ्यावे लागतील; सांगलीतून मुख्यमंत्री LIVE

| Updated on: Aug 02, 2021 | 3:14 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरपाठोपाठ आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. दोन्ही दौऱ्यात त्यांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरपाठोपाठ आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. दोन्ही दौऱ्यात त्यांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं सांगितलं. शहर असो वा गाव… ज्या ठिकाणी पूर येण्याची आणि दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणच्या वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. त्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीतील विविध गावांमध्ये जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. नंतर त्यांनी प्रशासनाकडून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरस्थितीची माहिती दिली. आपत्तीची वारंवारिता वाढली आहे. काही दिवसांचा पाऊस काही तासात पडतोय. दरडी कोसळत आहेत. रस्ते खचत आहेत. तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना घडली. निसर्गासमोर आपण हतबल असतो. नदीपात्रात पूररेषा, रेड लाईन, ब्लू लाईन वगैरे आहेत. त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. त्या ठिकाणी अतिक्रमण होता कामा नये, असं सांगतानाच काही ठिकाणी वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. शहर आणि गावातील वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. पाण्याला अडथळा असणारी बांधकामं दूर करावी लागणार आहेत. ते नाही केलं तर पूर संकटातून आपण कधीच बाहेर पडणार नाही. त्यासाठी तुमचं सहकार्य हवं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यात निर्बंध हटवण्याचे चिन्ह नाही, निर्बंधांसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील : Rajesh Tope
Mumbai | पोलादपूरच्या दरड दुर्घटनेत 13 वर्षीय साक्षी दिव्यांग, उपचारासाठी हवाय मदतीचा हात