Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला
सध्या राज्यात काही लोकांचं राजकीय पर्यटन सुरू आहे, असं सांगतानाच जुने व्हायरसही परत आले आहेत. या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ या कार्यक्रमात बोलताना हा सूचक इशारा दिला.
मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. सध्या राज्यात काही लोकांचं राजकीय पर्यटन सुरू आहे, असं सांगतानाच जुने व्हायरसही परत आले आहेत. या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ या कार्यक्रमात बोलताना हा सूचक इशारा दिला. सर्वांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं. इथून तिथे, तिथून इथे काहीजण प्रवास करत असतात. ते वेगवेगळी ठिकाणं पाहात असतात. मधल्या काळात तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यांनी एक शब्द वापरला होता. रिव्हेंज टुरिझम. म्हणजे टुरिझम रिव्हेंज. ते लक्षात आलं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं. जरा सावधता बाळगा. सर्व राज्यांना सांगितलं. कोरोनाचं संकट गेलं नाही. आणि पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होते की पुन्हा हे संकट येऊ शकेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.