Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ओएसडींना कोरोनाची लागण

Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ओएसडींना कोरोनाची लागण

| Updated on: Nov 15, 2021 | 9:13 PM

नाईक यांची कोविड-19 संसर्ग चाचणी पाँझिटीव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वाँक्हार्ट हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणुन मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड 19  संसर्ग तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) सुधीर नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. नाईक यांची कोविड-19 संसर्ग चाचणी पाँझिटीव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वाँक्हार्ट हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणुन मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड 19  संसर्ग तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही अधिक काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानाचं सँनिटायझेशन करण्यात आलंय. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही मार्च 2021 मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

Ashish Shelar | जुन्या फोटोचा असंबंध दाखला देत सरकारच अपयश लपवण्याच काम करु नका : आशिष शेलार
Breaking | कॉंग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनीतालमधील घराला आग लावून केली दगडफेक