Special Report | Anil Deshmukh यांचा पाय आणखी खोलात ? -tv9
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. कुंटे यांनी ईडीलादिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सिताराम कुंटे यांचा जबाब 7 डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. कुंटे यांनी ईडीलादिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सिताराम कुंटे यांचा जबाब 7 डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यासाठी अनधिकृत याद्या पाठवायचे असे कुंटे यांनी इडीला सांगितल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सिताराम कुंटे यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता. त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. कुंटे यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख हे संजीव पलांडे मार्फत बदल्यांसाठी पोलिसांच्या अनधिकृत याद्या पाठवायचे असा आरोप कुंटे यांनी देशमुखांवर केला आहे. मात्र याबाबत प्रश्न विचारला असता गृहमंत्री वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.