नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद
नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. नागपूरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. नागपूरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. शिवाय आज तिळी चतुर्थीला मंदिरात हार फुलं आणि पुजेचं साहित्य नेण्यावर निर्बंध आहे. आज तिळी चतुर्थी आहे, गणेशभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या तिळी चतुर्थीला नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात मोठी गर्दी होते, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.