Nagpur | नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांसाठी बालस्नेही कक्ष

| Updated on: Jul 30, 2021 | 3:49 PM

लहान मुलं असोत की मोठे कुणालाही पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची इच्छा होत नाही. पण नागपुरातील बर्डी पोलीस स्टेशन याला अपवाद आहे.

लहान मुलं असोत की मोठे कुणालाही पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची इच्छा होत नाही. पण नागपुरातील बर्डी पोलीस स्टेशन याला अपवाद आहे. या पोलीस स्टेशनमध्ये बच्चे कंपनी आता हौशीनं येणार आहेत. कारण बर्डी पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांसाठी बालस्नेही कक्ष उभारण्यात आलाय. यात मुलांची खेळणी, एखाद्या शाळेप्रमाणे टेबल्स, पाळणा, झोपण्यासाठी चक्क बेड आणि मुलांच्या विरंगुळ्यासाठी बरंच काही आहे. पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर तिथल्या वातावरणाचा मुलांवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून, हा बालस्नेही कक्ष उभारण्यात आलाय. आज या चाईल्ड फ्रेंडली पोलीस पोलीस कक्षाचं लोकार्पण करण्यात आलंय. राज्यातलं हे चर्चेतलं चाईल्ड फ्रेंडली पोलीस कक्ष आहे.
Pune Metro | अजित पवारांकडून पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, ड्रोनमधून पाहा पुण्याची मेट्रो
Devendra Fadnavis | अतिशय गांभीर्यानं या पुराकडे लक्ष द्यावं लागेल : देवेंद्र फडणवीस