पवार यांच्या रोड-शो दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, बघा व्हिडीओ
VIDEO | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भापचे कार्यकर्त्या आमने-सामने
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार चांगलाच शिगेला आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून प्रचारासाठी एका रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड येथे पिंपळे गुरव भागात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला आहे. तेथे ही राष्ट्रवादीची प्रचार रॅली दाखल होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी मोठा आपला फौजफाटा तैनात करून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Feb 23, 2023 11:06 PM