“…म्हणून एक उमेदवार उभा केला”, चिंचवड निकालावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी काय दिली प्रतिक्रिया

| Updated on: Mar 02, 2023 | 4:26 PM

VIDEO | वंचित बहुजन आघाडीने चिंचवडमध्ये उमेदवार उभा केला नसता तर..., पृथ्वीराज चव्हाण नेमके काय म्हणाले?

सुमेध साळवे, मुंबई : कसब्याच्या प्रचारासाठी केंद्रीय पातळीवरील नेते आले होते. पण, महाविकास आघाडी एकत्र आली. विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टाळली तर आपण विजयी होऊ शकतो, हा संदेश या निकालातून देण्यात आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तर चिंचवडच्या निवडणुकीत विरोधकांची मत विभाजन करण्यासाठी एक उमेदवार उभा केला गेला. त्या उमेदवाराने बरीच मत खाल्ली. त्यामुळे तिथं भाजपचा विजय झाला. चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने ताकत नसताना महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपला फायदा करून घेण्यासाठी उमेदवार उभा केला होता, असेही त्यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीने चिंचवडमध्ये उमेदवार उभा केला नसता तर काहीसे चित्र वेगळे असते. पण, वंचितमुळे ही जागा गेल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण व्यक्त केली.

Published on: Mar 02, 2023 04:26 PM
एका मतासाठी ५ हजार रूपये दिले गेले अन्… , राष्ट्रवादीच्या आमदारानं काय केला मोठा गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला अद्याप बाकी, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी