आधी मुख्यमंत्र्यांसमोर आता उदय सामंतांसमोर, स्वाती भोजनेचा आमदार,खासदारांचा पगार फिरवण्याची मागणी कायम, कार्यकर्तेच नाही, मंत्र्यांनीही हात जोडले

| Updated on: Jul 28, 2021 | 10:26 AM

आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी वळवा पण आम्हाला मदत करा अशी हाक या महिलेने मुख्यमंत्र्यांना दिली होती. आता या महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

दोन दिवस पुराच्या पाण्यात चिपळूणकरांचं सगळं साहित्य राहिल्यामुळे लाखो रुपयांच्या मालाचं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर नुकसानीचा आढावा घेत असताना व्यापाऱ्यांच्या वेदनांचा बांध फुटला. स्वाती भोजने या महिलेने त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अगदी पोटतिडकीने तिने आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना ऐकवल्या आणि मदतीची मागणी केली. वेळ पडल्यास आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी वळवा पण आम्हाला मदत करा अशी हाक या महिलेने मुख्यमंत्र्यांना दिली होती. आता या महिलेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवेळचा हा व्हिडीओ आहे

Published on: Jul 28, 2021 09:42 AM
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 28 July 2021
अंधेरीत बांधकाम सुरु असणारी चारमजली इमारत कोसळली, पाच जणांची ढिगाऱ्याखालून सुटका