Chiplun | काही पण करा, पण आम्हाला मदत करा, चिपळूणकर महिलेचा मुख्यमंत्र्यांकडे टाहो
मुख्यमंत्री आढावा घेत असतानाच स्वाती भोजने या महिलेने त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि अगदी पोटतिडकीने तिने आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना ऐकवल्या आणि मदतीची मागणी केली.
चिपळूण : दोन दिवस पूराच्या पाण्यात चिपळूणकरांचं सगळं साहित्य राहिल्यामुळे लाखो रुपयांच्या मालाचं नुकसान झालं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर आले आणि त्यांनी चिपळूणमधल्या नुकसानीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री येताच चिपळूणमधल्या व्यापाऱ्यांच्या वेदनांचा बांध फुटला. मुख्यमंत्री आढावा घेत असतानाच स्वाती भोजने या महिलेने त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि अगदी पोटतिडकीने तिने आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना ऐकवल्या आणि मदतीची मागणी केली. वेळ पडल्यास आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी वळवा पण आम्हाला मदत करा अशी हाक या महिलेने मुख्यमंत्र्यांना दिलीय.