रावणाला मदत करणाऱ्या शुर्पणखेला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवू नका : चित्रा वाघ

| Updated on: Oct 14, 2021 | 1:18 PM

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा, असा बोचरा वार केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली.

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा, असा बोचरा वार केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना 4 शब्दात उत्तर दिलं आहे.

“माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही. चित्राताईंच्या ट्विटवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या

Published on: Oct 14, 2021 11:41 AM
VIDEO : Kalyan | दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी, दादरसह कल्याणमध्येही नागरिकांची झुंबड
Navratri 2021 | तुळजाभवानी देवीच्या देवळात मानाच्या काठ्या दाखल