निवडणुकीच्या मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या, गुवाहाटी ते ईडीपर्यंत सगळ्याचा उल्लेख; कुठं घडला प्रकार?

| Updated on: Apr 30, 2023 | 2:45 PM

VIDEO | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्याचं चिठ्ठ्या, कुणी पाठवल्या चिठ्ठ्या अन् नेमका काय केला उल्लेख?

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल समोर आला आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला. कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीच्या मतपेटीत चिठ्ठया सापडल्यात. या चिठ्ठ्यांमधून स्थानिक नेत्यांना शेतकऱ्यांच्या कानपिचक्या पाहायला मिळाल्या. चिठ्ठ्यांमध्ये गुवाहाटी ते ईडी कारवायांपर्यत सगळ्याचा उल्लेख आठळून आलाय. तर चंद्रकांत पाटील यांना पक्ष वाढवण्याचाही सल्ला देण्यात आलाय. शुक्रवारी कोल्हापूर बाजार समितीसाठी चुरशीन 92 टक्के इतकंच मतदान झालं होतं. येथे 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात होते. तर आज रमणमळा शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये 36 टेबलवर मतमोजणी करण्यात येणार होती. बाजार समितीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी जनस्वराज्य विरुद्ध भाजप शिवसेना अशी लढत होतेय तर जयसिंगपूर बाजार समितीसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याचे समोर आले आहे. 18 पैकी 16 जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर एका जागेवर भाजप शिवसेना युती आणि एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे, विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला आहे.

Published on: Apr 30, 2023 02:41 PM
MPSC परिक्षेचा गोंधळ संपता संपेना, आता ‘या’ कारणामुळे विद्यार्थी हैराण
नितेश राणे असभ्य आणि वायफळ बोलतात; त्यांची दखल मी काय घ्यावी; ठाकरे गटाच्या नेत्याचं प्रत्यु्त्तर